ABP Majha Headlines : 3 PM : 12 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 3 PM : 12 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
माय माऊलींची राखी हाताला असेपर्यंत माझ्या जीवाला कुठलाही धोका नाही, धुळ्यात बोलताना अजित पवारांची भावनिक साद
धुळे दौऱ्यादरम्यान अजित पवारांचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद, लाडकी बहीण योजनेचा देखील पुरेपूर प्रचार
लाडकी बहीण योजनेला काऊंटर म्हणून काँग्रेसकडून कर्नाटकच्या धर्तीवर महालक्ष्मी योजनेचं आश्वासन, तर काँग्रेसच्या योजना फसव्या असल्याचा बावनकुळेंचा पलटवार
५ दिवसात भाजप आणि महायुती प्रचाराचे रान उठवणार, १६ ते १८ ऑगस्टदरम्यान अमित शाह महाराष्ट्रात तर १६ ऑगस्टला जेपी नड्डाही साताऱ्यात
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, जरांगे आणि ओबीसी नेत्यांनाही बैठकीसाठी बोलवण्याची सूचना
मातोश्रीबाहेर घोषणाबाजी करणारी माणसं एकनाथ शिंदेंसोबतची, फोटो दाखवून संजय राऊतांचा आरोप, सगळं दिल्लीच्या इशाऱ्यावर सुरु असल्याचाही दावा..
विधानसभा निवडणूक लढवण्यावर मनोज जरांगे २९ ऑगस्टला निर्णय घेणार, छगन भुजबळ आणि अनिल बोंडेना महत्त्व देत नाही... जरांगेंचं विधान