ABP Majha Headlines 2PM एबीपी माझा हेडलाईन्स 2 PM 19 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 2PM एबीपी माझा हेडलाईन्स 2 PM 19 July 2024 Marathi News
मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये मोठा तांत्रिक बिघाड, जगभरात बँक, हवाईसह अनेक सेवांचा खोळंबा,भारतात इंडिगो, स्पाइसजेट, अकासाची विमानसेवा बाधित
साताऱ्यात वाघनखांच्या प्रदर्शनाचा भव्य सोहळा, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित
रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस, पेण शहरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप
विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, भर पावसाळ्यात कारवाई का केली असा सरकारला सवाल..
बुलढाणा जिल्ह्यातल्या दगडफेक झालेल्या साखरखर्ड्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची भेट, सोबत स्थानिक आमदार राजेंद्र शिंगणेही,पोलीस आणि गावकऱ्यांशी साधला संवाद..
मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका, शिक्षण हक्क कायद्यातून खाजगी आणि विनाअनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द, अचानक निर्णय घेणं घटनाबाह्य असं निरीक्षण ..
काँग्रेस कमिटीचीही मुंबईत बैठक, सर्व 288 जागांचा घेतला जातोय आढावा, उमेदवार आणि जनमतावर होतोय काथ्याकूट, १५० जागा लढा असा नेत्यांचा सूर...