ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 24 June 2025 एबीपी माझा दुपारी 12 च्या हेडलाईन्स
१२ दिवसांच्या युद्धानंतर, इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवर सहमती, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडूनही सरकारी टीव्हीवर युद्धबंदी जाहीर
इस्रायलच्या तेल अवीवसह जेरूसलेममध्ये पुन्हा स्फोट, हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरनही वाजले, युद्धबंदी जाहीर होऊनही पुन्हा हल्ले झाल्याची शक्यता
भारताची तातडीची शस्त्रास्त्र खरेदी, २००० कोटींचे १३ करार, दहशतवाद विरोधी लढ्यासाठी लष्करासाठी शस्त्रखरेदी
बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु... ब वर्ग गटातून अजित पवार विजयी, तीन ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाल्याने धाकधुक वाढली
इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावर साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या वर्षावरील बैठकीत निर्णय
तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेत दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती, भाजप प्रवेशाची चर्चा असतानाच घोसाळकरांवर ठाकरेंकडून जबाबदारी
पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीरावांचं नावं द्या,, भाजप खासदार मेधा कुलकर्णींची मागणी... तर महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव देण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी..
पुढील ५ दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता... रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा.. तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधारेचा अंदाज...
नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस, रामकुंड परिसरातील लहान-मोठी मंदिरं पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, गंगापूर आणि नांदूरमध्यमेश्वरमधून गोदावरीत विसर्ग























