ABP Majha Headlines 12 PM Top Headlines 23 June 2025 एबीपी माझा दुपारी 12 च्या हेडलाईन्स
शरद पवारांना सोडून चूक केली याचा अर्थ आपण नाराज आहे असं नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण...उद्धव ठाकरे जाधवांशी चर्चा करणार, राऊतांची माहिती...उद्धवजींना भेटायला अपॉइंमेंट लागत नसल्याची जाधवांनी प्रतिक्रिया...
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्रिभाषा सूत्रीसंदर्भात आज महत्त्वाची बैठक...सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता... तर मनसेकडून अनेक शाळांबाहेर स्वाक्षरी मोहीम...
तोट्यातल्या एसटीचा अखेर लेखाजोखा जाहीर होणार, एसटीची श्वेतपत्रिका आज जाहीर होणार, मंत्रिपदी आल्यावर प्रताप सरनाईकांनी दिले होते श्वेतपत्रिकेचे आदेश
गाडीचा हॉर्न जोरात का वाजवला या कारणावरून दोन गटात दगडफेक...सोलापुरातील घोंगडे वस्तीतील घटनेत सात जण जखमी...दोन्ही गटातील तीनशेहून अधिक लोकांचा जमाव समोरासमोर...
मुंबईत त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वत:च्याच आजीला फेकलं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात...पोलिसांनी महिलेला केलं रूग्णालयात दाखल...पोलिसांकडून कुटुंबीयांच्या शोध सुरू...
बुलढाण्यात शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या आगमनाआधी विद्यार्थ्यंना जुंपलं कामाला...विद्यार्थ्यांकडून झाडून घेतली शाळा...चौकशी करून कारवाई करणार, माझाच्या बातमीनंतर भुसेंचं आश्वासन...
सांगलीत वडिलांकडून झालेल्या अमानुष मारहाणीत मुलीचा मृत्यू...नीट परिक्षेत गुण कमी पडल्यानं मुख्याधापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण...
नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरूच...जिल्ह्यतील पाणीसाठा ४३ टक्क्यांवर...मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज...























