ABP Majha Headlines : 6.30 AM : 12 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकचे उमेदवार मागे घ्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी... आमचे प्रवक्ते उत्तर देतील, आदित्य ठाकरेंचं उत्तर..
बारामतीत युगेंद्र पवारांच्या जनता दरबारात शरद पवारांची उपस्थिती, विधानसभा निवडणुकीत बारामतीतून युगेंद्र यांना तिकीट द्या, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी
४०० पारचा नारा लोकांनी डोक्यात ठेवला, भुजबळांनंतर एकनाथ शिंदेंचाही सुरात सूर...नाशिकमध्ये कांदा तर मराठवाड्यात सोयाबीनचा फटका बसल्याचं केलं मान्य...
गोड बोलून काटा काढण्याचा सरकारचा डाव, मनोज जरांगेंचा आरोप, चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगेंचा उपचार घेण्यास नकार, आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक, जरांगेंची भेट घेत संदीपान भुमरेंचं आश्वासन
मालेगाव तालुक्यात अजंग-वडेल परिसरात विजेच्या कडकडाटसह ढगफुटी सदृश पाऊस, अनेक भागांमध्ये साचलं पाणी
आषाढी वारीसाठी एसटी महामंडळ ५ हजार जादा बसेस सोडणार, ग्रुप बुकिंग असल्यास कुठल्याही गावातून थेट पंढरपूर गाठता येणार
चंद्राबाबू नायडू आज घेणार आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पंतप्रधान मोदींसह एनडीएचे प्रमुख नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावणार.