ABP Majha Headlines : 1 PM : 12 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM : 12 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
उरण हत्या प्रकरणातील मृत यशश्री शिंदेंचा मोबाईल फोन पोलिसांच्या हाती, फोन तपासणीसाठी पाठवणार, हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार
नागपुरात पुन्हा हिट अँड रन, व्हीएनआयटी कॉलेजसमोरील रस्त्यावर उभ्या कारला जोरधार धडक, एक जण जखमी, धडक देणाऱ्या कारमधील आरोपींचा शोध सुरु
उपमुख्यमंत्री अजित पवार आज मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर, गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर सुरक्षेत वाढ
आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडे, भाजप कोअर कमिटीचा निर्णय, निवडणुकाही फडणवीसांच्या नेतृत्त्वात
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या रिंगणात, सोशल मीडियावर पोस्ट करत घोषणा, वर्सोव्याच्या झुलेलाल मंदिरात पूजेनंतर प्रचाराला सुरुवात
पुण्यातील सभेनंतर भोवळ आल्याने मनोज जरांगेंवर सह्याद्री रुग्णालयात उपचार, सकाळी ११ नंतर अहमदनगरकडे होणार रवाना
बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील बाबा सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, आठ भाविक मृत्युमुखी, पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचा भाविकांचा आरोप
सेबी अध्यक्ष माधवी बुच याचं स्पष्टीकरण म्हणजे आरोपांची अंशतः कबुली असल्याची हिंडनबर्गची एक्सवर पोस्ट, सेबी आणि अदानी समुहाने मात्र फेटाळले आरोप
हिंडनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग, काँग्रेस-तृणमूलसह विरोधकांकडून माधवी बुच यांच्या राजीनाम्याची मागणी तर गुंतवणूकदारांना चिंता आजच्या मार्केटची