ABP Majha Headlines : 10 PM: 15 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेचेे आमदार संजय शिरसाटांचा दावा...लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईकरेट जास्त असल्याचा दावा.. भाजप नेत्यांचा पलटवार
महाविकास आघाडीत मोठा भाऊ, छोटा भाऊ कोणी नाही, निवडून येण्याची शक्यता असेल त्यांची ती जागा...पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण...
विधानसभा स्वबळावर की आघाडीतून लढणार, काँग्रेसमध्ये संभ्रम...
२८८ जागांची तयारी, पटोलेंचा पुनरूच्चार...तर मविआ एकत्रित लढणार, पृथ्वीराज चव्हाणांची घोषणा...
खोटं नॅरेटिव्ह तयार केलं या भाजपनं केलेल्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर, मंगळसूत्र चोरणार, नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का? ठाकरेंचा सवाल
सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधान, शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा
कोकणातून शिवसेना संपवली, नारायण राणेंचं विधान...शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायचीय, विनायक राऊतांचं उत्तर...
नाशिक महायुतीत बेबनाव... शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बैठकीला छगन भुजबळांची दांडी...तर नाराज असल्याच्या केवळ वावड्या भुजबळांचं स्पष्टीकरण
चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर कोणी नेलं हे जगजाहीर, विशाल आणि विश्वजीत यांची जयंत पाटलांचं नाव न घेता माझा कट्टयावर टीका
अजित पवारांच्या क्लीनचीटला आक्षेप घेतला नाही,
शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा मोठा खुलासा
राज्यातल्या तीन शक्तिपीठांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग वादाच्या भोवऱ्यात...कोल्हापूरसह १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा महामार्गासाठी जमिनी द्यायला विरोध...
गुजरातचे गुत्तेदार पोसण्यामुळे महाराष्ट्रातील
४८ लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा घणाघात, तर शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून गणवेशाबाबत माहिती घेऊ, उदय सामंतांचं आश्वासन
पुण्यात जामिनावर सुटलेल्या ३ आरोपींचा हैदोस. दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला,.. एकाचा मृत्यू, दोन आरोपी अल्पवयीन
परभणीच्या जिंतुर तालुक्यात मुसळधार पाऊस...
जिंतूर-बामणी रोडवरील अंगलगाव परिसरात ओढ्याला पूर...20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
टी-ट्वेन्टी विश्वचषकातील भारत-कॅनडा सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना एकेक गुण, भारताचं गटातील अव्वल स्थान कायम, आता लक्ष सुपर एटमधील लढतींकडे
G7 परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, जॉर्जिया मेलोनींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काढला सेल्फी
![Suresh Dhas Meets Dhananjay Munde : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट कुणी घडवून आणला?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/87a856e8ee7dbfab97d7fb8c03df4d741739588419448976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 February 2025 माझं गाव, माझा जिल्हा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/75aff376f41ff00a9e9cc682c2cb86da1739587616907976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/ce18c8fa91fd4313a6938b6cd768de691739583808343976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PM Modi America Tour :मोदी ट्रम्प यांची गळाभेट, अमेरिका भेटीतून काय साधलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/40d7726b911f0a07eebeadcf0ebecaf91739583400186976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas PC :प्रदेशाध्यक्षांनी जेवायला बोलावलं अन् अचानक मुंडे तिथं आले,अवघ्या 2 तासांत सूर बदलले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/dc70b7515878e900b43b316ccfddf45017395541596671000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)