ABP Majha Headlines 07AM TOP Headlines 10 June 2025 एबीपी माझा 07AM च्या हेडलाईन्स
मुंब्रा अपघातामुळे दररोज लोकलनं प्रवास करणारे कोट्यवधी प्रवासी सुन्न, एकमेकांना क्रॉस करणाऱ्या दोन लोकलमधले १३ प्रवासी खाली पडले, चौघांचा मृत्यू
रेल्वे अपघातात जीआरपीमध्ये कार्यरत असलेल्या जवानावर काळाचा घाला..आयटी इंजिनियर मयूर शाहसह राहुल गुप्ता, सरोज केतनचाही मृत्यू..
कल्याण ते कसारा तिसऱ्या रेल्वे लाईनचं नियोजन तर सर्व लोकलचे डबे १२ वरुन १५पर्यंत करणार, रेल्वे प्रशासनाची दुर्घटनेनंतर मोठी घोषणा.
कल्याण ते कसारा तिसऱ्या रेल्वे लाईनचं नियोजन तर सर्व लोकलचे डबे १२ वरुन १५पर्यंत करणार, रेल्वे प्रशासनाची दुर्घटनेनंतर मोठी घोषणा.
अपघात रोखण्यासाठी लोकलला स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याची रेल्वेची योजना, तर प्रवासी गुदमरून मरतील, राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
लोकलमधून प्रवास करताना मुंबईत दररोज सात जणांचा मृत्यू, गेल्या २० वर्षांत ५० हजारांपेक्षा अधिक जणांनी गमावला जीव
बाहेरच्या लोंढ्यांमुळं मुंबईची रेल्वे सेवा कोलमडली, मुंब्रा लोकल अपघातानंतर राज ठाकरेंचा हल्लाबोल, मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड देण्याची पुन्हा मागणी...
गाई-म्हशी कोंबल्यावर हिंदूंना त्रास होतो मग माणसांची गर्दी दिसत नाही का?, मुंब्रा दुर्घटनेसंदर्भात बोलताना सपाचे आमदार अबू आझमी बरळले,
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश... कोल्हापूर, सांगलीनंतर आता कोल्हापुरात ऑपरेशन टायगर उदय सामंतांचं सूचक वक्तव्य
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं, अजितदादांनी मंचावरील स्वत:ची नेमप्लेट बाबासाहेब पाटलांच्या नेमप्लेटसोबत बदलली
इंदूरमधून मेघालयात हनीमूनला गेलेल्या राजा रघुवंशींची पत्नी सोनमकडूनच हत्या, सोनमसह चार सुपारी किलर्सना अटक.
पीओपी गणेश मूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी..कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन करण्यावर सहमती दर्शवल्यानंतर मोठा निर्णय
महत्त्वाच्या बातम्या























