ABP Majha Headlines : 11 AM : 09 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
आज नरेंद्र मोदींचा शपथविधी, संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदींना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ
शपथविधीसाठी आत्तापर्यंत २२ जणांना फोन, भाजपच्या आठ, जेडीयूचे २, त्याशिवाय चिराग पासवान, एचडी कुमारस्वामी यांनाही मंत्रीपदाचा कॉल
रामदास आठवलेंनाही मंत्रिपद शपथविधीचं आमंत्रण, मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्येही आरपीआयला मानाचं पान
रावेरच्या खासदार रक्षा खडसेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी.. तर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांना शपथविधीचा कॉल
राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांना मंत्रिपदाचा निरोप नाही, एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, नारायण राणेही अजून वेटींगवर
दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक... मंत्रिदासाठी अद्याप नाव निश्चित न झाल्यानं बैठकीत खलबतं
पंतप्रधान मोदींसह ५२ ते ५५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता, तेलगू देसमला एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रीपदं, जेडीयूला एक कॅबिनेट, एक राज्यमंत्रीपद, तर शिवसेना, राष्ट्रवादीला एक एक मंत्रिपदाची शक्यता
शपथविधीआधी महात्मा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला मोदींकडून अभिवादन तर वॉर मेमोरिअल येेथे शहिदांचं स्मरण
जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस, ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देणार त्याला विधानसभेला पाडणार, धनंजय मुंडेंचं नाव न घेता जरांगेंचा इशारा
मराज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा, सिंधुदुर्गाला रेडअलर्ट, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावरही अतिमुसळधार पावसाची शक्यता, संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट