ABP Majha Headlines : 6:30 AM : 17 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आज ठरणार, राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज विस्तारित बैठक, अमित शहा, जेपी नड्डांसह सर्व राष्ट्रीय पदाधिकारी राहणार उपस्थित
पुण्यात 'माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभाचा आज राज्यस्तरीय शुभारंभ, एका क्लिकवर जमा होणार एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये
लाडकी बहीण योजनेचा आज पुण्याच्या बालेवाडीत भव्य सोहळा, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावरची अवजड वाहनांची वाहतूक २४ तासांसाठी बंद
कोलकात्यातल्या महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणावरुन आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप, उद्या सकाळी ६ पर्यंत ओपीडी सेवा बंद राहणार
रामगिरी महाराजांचं मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य, संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये पडसाद, २ ठिकाणी गुन्हे दाखल होऊनही रामगिरी वक्तव्यावर ठाम
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांचा मुख्यमंत्री शिंदेंकडून संत असा उल्लेख, गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटलांचाही रामगिरींना साष्टांग दंडवत
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून कोणतंही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, उद्धव ठाकरेंची घोषणा...शरद पवार आणि काँग्रेसकडून सावध भूमिका...
महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता...गणेशोत्सव, दिवाळी आणि पितृपक्ष असल्याने अजून तारीख जाहीर नाही, निवडणूक आयोगाची माहिती...
राहुूल गांधींकडे ब्रिटीश नागरिकत्व, त्यामुळं भारताचं नागरिकत्व काढून घ्या, सुब्रमण्यम स्वामींची दिल्ली हायकोर्टात याचिका