(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhay Deshpande on Sharad Pawar : सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची 'डिप्लोमसी?'
Abhay Deshpande on Sharad Pawar : सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांची 'डिप्लोमसी?' एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या काकडे कुटुंबीयांची शरद पवारांनी आज सांत्वनपर भेट घेतली. माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचं नुकतेचं निधन झालं. म्हणून काकडे कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी पवारांनी भेट घेतल्याचं सांगण्यात येतंय. मात्र यामागे राजकीय गणितं देखील असू शकतात. याचं कारण म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून अजित पवारांनी काकडे कुटुंबीयांशी जुळवून घेतलंय. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काकडे कुटुंबीय हे अजित पवारांना मदत करतात की काय, अशी चिंता पवारांच्या मनात असू शकते. याचं कारण म्हणजे काकडेंप्रमाणेच राजकीय प्रतिस्पर्धी असलेले अनंतराव थोपटे यांची देखील पवारांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती.