(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aavdiche Khane Rajkiya Tane Bane:माहिममधून माघार का घ्यायची,नेहरू उभे आहेत का?Sanjay Raut Exclusive
Aavdiche Khane Rajkiya Tane Bane:माहिममधून माघार का घ्यायची,नेहरू उभे आहेत का?Sanjay Raut Exclusive
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर जोरकसपणे टीका करत आहेत. अशातच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत, असे राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही. उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उद्देशून असलेलं, 'एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन', हे वक्तव्य केवळ राजकारणापुरतं मर्यादित होतं, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्यासोबत मी कधीही चहासुद्धा प्यायला नाही. मी एक कडवट शिवसैनिक आहे, असे सांगत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी पडद्यामागून चर्चा सुरु असल्याची शक्यताही फेटाळून लावली. ते शनिवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, अमित ठाकरे आणि मविआचे जागावाटप अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि मुख्यमंत्री हा मविआचाच असेल. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे, असे मला वाटते. आमच्या मित्रपक्षांनी याचा विचार करावा. मित्र शब्दाला किंमत देतो. उद्धव ठाकरे यांनी मविआच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, असे जाहीरपणे सांगितले होते. पण आगामी काळात राज्याचे नेतृत्व कोणाच्या हाती असणार, हे जाहीर झालं तर मतदानाची टक्केवारी वाढते, असा युक्तिवाद संजय राऊत यांनी केला.