Bhagwant Mann Oath : पंजाबचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाच्या भगवंत मान यांनी आज घेतली शपथ
पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाच्या भगवंत मान यांनी आज शपथ घेतली. पंजाबमध्ये तब्बल ९२ जागा जिंकून आपने सत्ता मिळवली. त्यानंतर आज शहीद भगतसिंगांचं मूळ गाव खटकर कलां इथं मान यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मान यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे नेते उपस्थित होते. खटकर कला इथं झालेल्या या शानदार सोहळ्याला हजारो लोक उपस्थित होते. पुरुषांनी पिवळी पगडी आणि महिलांनी पिवळा दुपट्टा घालून यावं असं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार हजारो लोक या ड्रेसकोडमध्ये शपथविधी सोहळ्यासाठी आले होते. अमेरिकेत असलेले मान यांचे पुत्र आणि कन्या या सोहळ्यासाठी खास उपस्थित होते.





















