9 Sec Superfast News | Top 90 | 9 AM | 9 सेकंदात बातमी | 28 April 2025 | ABP Majha
9 Sec Superfast News | Top 90 | 9 AM | 9 सेकंदात बातमी | 28 April 2025 | ABP Majha
पहलगाममधील दहशतवादी हल्याचा तपासाला वेग, NIAने घटनास्थळाचे डिजिटल मॅपिंग केले असून गोळा केलेले नमुने न्यायवैदयक प्रयोगशाळेला पाठवले,तसेच बैसरन व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील CCTV ही ताब्यात घेतले असून तपासणी
पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मूच्या दोडा आणि किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई,
दहशतवाद्यांच्या घरांची सुरक्षा दलांकडून झाडाझडती
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज जम्मू काश्मीर विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन, हल्ल्या संदर्भात होणार चर्चा.
काल सीडीएस जनरल अनिल चौहान यांची राजनाथ सिंह यांच्यासोबत पार पडली बैठक, या बैठकीनंतर आज राजनाथ सिंह 11 वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेणार,पाकिस्तानसोबत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व.
देशात हजारो पाकिस्तानी आले कुठून?, सामनाच्या अग्रलेखातून
सवाल, बेकायदेशीरपणे पाकिस्तानी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडे थाटतातच कशी? असा सवाल उपस्थित करत मोदी सरकावर निशाणा























