(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati Ganesh Chaturthi 2021 : अमरावतीत एकाच घरात 351 बाप्पाच्या मूर्तीची स्थापना...!
भारताच्या विविध राज्यातून आणि परदेशातून आणलेल्या 351 गणेशमूर्तीची अमरावतीत एका गणेशभक्ताने राहत्या घरातच स्थापना केली आहे. तब्बल 351 गणेशमूर्तीची स्थापना आपल्या राहत्या घरातच करून खंडेलवाल गणेशभक्त कुटुंबाने नवा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. अमरावतीच्या खंडेलवाल कुटुंबांनी 23 वर्षांपूर्वी आपल्या घरी 11 गणेश मूर्तीची स्थापना केली. पर्यटनानिमित्त देशात फिरताना विविध राज्यातील भौगोलिक प्रदेशानुसार तेथे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या गणेशमूर्ती खरेदी करून दरवर्षी त्या मूर्तीची स्थापना करण्यात येत होती. दरवर्षी गणेशमूर्तीच्या संख्येत वाढ होत गेली आणि यावर्षी तब्बल 351 गणेश मूर्तीची स्थापना खंडेलवाल कुटुंबाने केली. स्थापना करण्यात आलेल्या गणेशमूर्तींमध्ये विविध रूपे दर्शवण्यात आली आहेत. गणेश मूर्तीमध्ये विविध रूपे दर्शविण्यात आली आहे. पाळण्यात झोपणारी गणेशाची मुर्ती, शेतात कामे झाल्यानंतर बैलगाडीवर आराम करणारी गणेशाची मुद्रा, सायकल रिक्षातून फिरणारा गणेश यासह नवी दिल्ली, बँगलोर, जयपूर, कोलकाता, इंदोर, भोपाळ, मुंबई, पाटणा, रांचीसह काही मूर्ती या विदेशातून आणण्यात आल्या आहेत. या सर्व गणेशमूर्तीमध्ये दरवर्षी वाढ होते. मूर्ती ठेवण्यासाठी त्यांच्या घरात एक स्वतंत्र खोली आहे. शिवाय वर्षभर घरातील एका खोलीत गणेशमूर्ती ठेवण्यात येऊन पूजा करण्यात येते. खंडेलवाल कुटुंबाची गणेशभक्ती बघून त्यांच्या सहकारी स्नेही मंडळंनीही खंडेलवाल दांपत्याला गणेशमूर्ती भेट दिल्या आहेत. त्यामुळे गणेश मूर्तीच्या संग्रहात दरवर्षी वाढ होत आहे. ही वाढ होत आता तब्बल 351 च्या वर गणेशमूर्तींचा संग्रह खंडेलवाल यांच्याकडे झाला आहे.