LPG cylinder price| सर्वसामान्यांना झटका, गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ
पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी 769 रुपये मोजावे लागणार आहे. आज (15 फेब्रुवारी) दुपारी 12 पासून हे दर लागू होणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. सिलेंडरची किंमत 694 रूपयांवरून 719 रुपये करण्यात आली होती.
तसेच नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भावही गगनाला भिडले आहे. . पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.19 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.02 रुपयांवर पोहेचले आहेत.





















