Latur : Riteish Deshmukh आणि Genelia यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ABP Majha
बातमी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यावर भाजपने केलेल्या आरोपांची. लातूर एमआयडीसीमध्ये १६ उद्योजकांची प्रतीक्षा यादी असताना त्यांना डावलून रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला अवघ्या १० दिवसांत भूखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय. याशिवाय लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ११६ कोटींच्या कर्जाचा पुरवठा अवघ्या काही दिवसात कसा केला असा सवालही भाजपनं केलाय. या कंपनीवर आता लातूर बँकेनेही आक्षेप घेतल्याचा दावा भाजपनं केला आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्या देश अॅग्रो प्रा लिमिटेड या कंपनीसाठी यंत्रणा वेगाने कामाला लागली आणि भूखंड मंजुरीसह कर्ज प्रक्रिया गतीने पार पाडण्यात आली असा भाजपचा आरोप आहे. याबाबत रितेश आणि जेनेलिया यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


















