(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BIPIN RAWAT: थोड्याच वेळात बिपीन रावत यांना अखेरचा निरोप ABP MAJHA
देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर थोड्याच वेळात दिल्लीतील ब्रार स्क्वॉयर येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सकाळी साडे दहा वाजता जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस खासदार राहुल गांधी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांनी जनरल रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली. बिपीन रावत यांचे राहते घर ते ब्रार स्क्वॉयरपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली... सध्या बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे पार्थिव ब्रार स्क्वॉयर येथे ठेवण्यात आलं... दुपारी ४.४५ वाजता दिल्लीतील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ब्रार स्क्वॉयर येथे ८०० सैनिक तैनात असणार आहेत... या ८०० सैनिकांमध्ये वायूसेना, नौदल आणि लष्कराचा समावेश असणारेय... तर तीनही सेना दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांना आदरांजली वाहतील, तर ८०० सैनिकांकडूनही मानवंदना वाहिली जाईल, त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून श्रद्धांजली वाहिली जाईल, त्याचबरोबर श्रीलंका, भूटान, बांगलादेश आणि नेपाळ या देशांचे सुरक्षा प्रमुखही उपस्थित राहणार आहेत....