Shiv Sena Morcha Dhairyasheel Mane : आक्रमक शिवसैनिक धैर्यशील माने यांच्या घरापर्यंत पोहोणार?
Shiv Sena Morcha against MP Dhairyasheel Mane : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
शिवसैनिकांकडून घराकडे जाण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या तिन्ही जिल्हाप्रमुखांना ताब्यात घेतले. यावेळी काही काळ शिवसैनिकांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची बाजू समजून घेणार असल्याचे म्हटले आहे.
तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी 400 मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मोर्चा रोखला आहे. मात्र, शिवसैनिक अजूनही धैर्यशील मानेंच्या घराकडे जाण्यास आक्रमक आहेत. त्यामुळे संभाजी महाराज पुतळ्यानजीक शिवसैनिकही ठाण मांडून बसले आहेत. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे आणि संजय पवार करत आहेत. मोर्चाला शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती लावताना खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. गली गली मै शोर है माने चोर है अशाही घोषणाही यावेळी शिवसैनिकांनी दिल्या.
![Kolhapur Boy On Buldhana Hair Loss | माझ्या औषधामुळे बुलढाण्यातील टक्कल पडलेल्यांना केस येऊ शकतात,'या' तरुणाचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/e5887726ce0786c2fd3e192473a112e817372076257991000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/12/20925696eafec7b46f2d5103f922053c1736653824138718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Special Report Kolhapur Pandurang Tatya : डॉक्टर म्हणाले डेड पण तात्या चालत पोहोतले घरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/cbc4e2c432f59e3a165da5ab8a8992e41735841127290976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/4e7dbfc8ce2336d05f3004d13eef4d4b1735817771614718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Kolhapur : कोल्हापुरात चमत्कार! मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/d5d120711147df7b1ae4ac6bd74818e9173580970933290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)