Shambhuraj Desai on Kolhapur : अशा घटनांच्या मुळाशी कोण शोधणार, गरज पडल्यास CID तपास करु
Shambhuraj Desai on Kolhapur : अशा घटनांच्या मुळाशी कोण शोधणार, गरज पडल्यास CID तपास करु
Chhatrapati Sambhaji Nagar News : आक्षेपार्ह स्टेट्स ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आज हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने कोल्हापुरात सद्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूरातील हिंसाचाराची परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगर पोलीस अलर्ट झाली आहे. तर जिल्ह्याभरातील सर्वच पोलीस ठाणेप्रमुखांना पेट्रोलींग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच सोशल मिडीयावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.






















