(Source: ECI/ABP News/ABP Majha)
kolhapur District bank Ed Inquiry : अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची ईडीकडून तांत्रिक तपासणी
दोन दिवसांआधी ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतलेले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशीनंतर सुटका झालीय. मुंबईत शुक्रवारी दिवसभर झालेल्या चौकशीनंतर कार्यकारी संचालक ए. बी. माने यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं... आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित बँक खात्यांची ईडी कडून चौकशी केली होती अशी माहिती मिळतेय.... या अधिकाऱ्यांना ईडीने ताब्यात घेतल्याने काल जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय बंद पुकारला होता. दरम्यान, रिझर्व बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची तांत्रिक तपासणी झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे... राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ हे या बॅंकेचे अध्यक्ष आहेत. आधीच हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी झालीय. त्यापार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या चौकशीमुळे हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडारवर आल्याचं बोललं जातंय.