Kirti Shiledar passes away : संगीत रंगभूमीवर शोककळा,कीर्ती शिलेदार यांचं निधन : ABP Majha
तब्बल सहा दशकांच्या सेवेनं संगीत रंगभूमी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन झालंय. वयाच्या सत्तराव्या वर्षी पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. . संगीत रंगभूमीवरील त्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी संगीत रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. वडील जयराम शिलेदार आणि आई जयमाला शिलेदार यांच्याकडून त्यांना हा कलेचा वारसा मिळाला होता. त्यांनी तो पूर्ण ताकदीनं जोपासला. जवळपास ६० वर्ष त्यांनी संगीत क्षेत्राची आणि रंगभूमीची सेवा केली. 2018 साली त्या अखिल भारतीय नाट्य संमेलानाच्या अध्यक्षही राहिलेल्या होत्या. देशविदेशातून त्यांनी 1900 हून अधिक संगीत मैफिलीही गाजवल्या. त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं संगीत रंगभूमीवरील एक शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त होतेय.




















