सांगोल्यातील खिल्लारी गुरांचा बाजार 8महिन्यांनी पुन्हा सुरू,पहिल्याच दिवशी दीड कोटी रुपयांची उलाढाल!
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पशुपालकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिलासा देत जनावरांच्या बाजाराला परवानगी दिली आणि सांगोल्यातील पहिल्याच खिलार गुरांच्या बाजारात तब्बल कोठभर रुपयांची उलाढाल झाली . दसऱ्याच्या मुहूर्तावर सांगोला कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये खिलार खोंडे , बैले , म्हशी आणि इतर जनावरे मोठ्या संख्येने या बाजारात दाखल झाली होती . पश्चिम महाराष्ट्रात खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेला सांगोल्याचा जनावरांचा बाजार तब्बल ८ महिन्यानंतर सुरू होत असल्याने लांबून जनावरे बाजारात दाखल झाली होती . इतक्या दिवसांनी बाजार भरल्याने खरेदी विक्रीही जोरात झाली असून आज पहिल्याच दिवशी दीड कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाली असल्याचे बाजार समितीचे सभापती गिरीश गंगथडे यांनी सांगितले.




















