Uddhav Thackeray Jalgaon : उद्धव ठाकरेंच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
Uddhav Thackeray Jalgaon : उद्धव ठाकरेंच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरातील पिंप्राळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. तसेच महापालिकेच्या आवारात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचाही पुतळा साकारण्यात आला आहे. महापालिकेत सध्या ठाकरे गटाची सत्ता आहे, त्यामुळे या दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धवी ठाकरे यांच्या हस्ते आज होत आहे. अनावरणाच्या सोहळ्यावरुन सुरु असलेल्या वादावर पडदा टाकण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे जळगाव शहरात दाखल झाले असून आज विविध कार्यक्रमासंह जाहीर सभा होत आहे. मनपाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळा अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मात्र या पुतळा अनावरणावरुन चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. हा अनावरण सोहळा प्रोटोकॉलनुसार म्हणजेच राजशिष्टाचारनुसार घेण्यात यावा. मुख्यमंत्र्याच्या उपस्थित घेण्यात यावा, अशी मागणी भाजपा शिंदे गटाच्या आमदारांनी मनपा आयुक्ताकडे केली होती. मात्र आता वादात भाजपाने एक पाऊल मागे घेतल्याचे समजते आहे, त्यामुळे आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.