Sonam Kapoor: सोनम कपूरच्या सासऱ्यांची 9 जणांकडून 27 कोटींची फसवणूक ABP Majha
अभिनेत्री सोनम कपूर हिचे सासरे हरीश अहुजा यांची २७ कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. हरीश अहुजा यांची शाही एक्स्पोर्ट फॅक्टरी ही आयात-निर्यात करणारी कंपनी आहे. सरकार निर्यात कंपन्यांना ROSCTL ((आरओएससीटीएल)) परवान्यांच्या स्वरूपात काही इन्सेन्टिव्ह देते. यामुळे त्यांना उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्कात काही सूट मिळू शकते. हे ROSCTL परवाने काही लाख रुपयांच्या डिजिटल कुपनसारखे असतात. आरोपींनी कंपनीसाठी खोटी १५४ डिजिटल कुपन्स तयार केली. त्यानंतर त्यांनी इतर आरोपींच्या मदतीनं आहुजा यांच्या शाही कंपनीमधून 27.61 कोटी रुपये ट्रान्सफर केले. या प्रकरणी फरिदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं चार राज्यांमधून नऊ जणांना अटक केली आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
