Ravi Shastri: रवी शास्त्रींचा बीसीसीआयवर धक्कादायक आरोप ABP Majha
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळाबद्दल धक्कादायक विधान केल्यानं क्रिकेट विश्वात खळबळ माजलीय. बीसीसीआयमधील काही लोकांना मी भारतीय संघाचा प्रशिक्षक बनू नये अशी इच्छा होती. २०१४च्या अॅडलेडमध्ये कसोटीदरम्यान धोनीच्या जागी विराट कप्तान झाला. मात्र मला अचानक बाहेर काढण्यात आले. या निर्णयामुळे मला दु:ख झाले. कारण मला ज्या पद्धतीने हटवण्यात आले ते योग्य नव्हते. मला दूर करण्याचे आणखी चांगले मार्ग असू शकतात. मी संघ सोडला तेव्हा तो चांगल्या स्थितीत होता. माझ्या दुसऱ्या कार्यकाळात मी अनेक वादानंतर आलो. मला बाहेर ठेवू पाहणाऱ्यांच्या तोंडावर लगावलेली ही चपराक होती. असं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या























