Rahul Gandhi vs Narendra Modi : माेदी सरकारच्या निर्णयांबाबत राहुल गांधींची भाकीतं अचुक ठरतायत ?
PM Narendra Modi Address to Nation Withdrawing Farm Laws : मी तिनही कृषी कायदे मागे घेतोय... असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तिनही कृषी कायदे मागे घेतले. गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं मोदींनी ही मोठी घोषणा केली. मोठी घोषणा करताना मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे. गेल्या दीड वर्षाहून जास्त काळ कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. तब्बल 359 दिवस शेतकऱ्यांनी राजधानीच्या सीमेवर आपला लढा सुरु ठेवला. आज अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळालं. केंद्र सरकारसोबत बैठकांवर बैठका झाल्या, मात्र बळीराजा काही झुकला नाही. तो आपल्या मागण्यांवर ठाम होता. दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन अनके टप्प्यांमधून गेलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हे कायदे चुकीचे असून सरकारला ते मागे घ्यावेच लागणार असं भाकीत केलं होतं आणि आज ते भाकीत खरं ठरलं. असंच एक भाकीत त्यांनी नोट बंदीच्या वेळेस सुद्धा केले होते. राहुल गांधीची मोदी सरकारच्या निर्णयांबाबतची भाकीतं खरी ठरतायत का?
![Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f11df49eed4e9cd2c7c2e312907f07091739729487045718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ganga River Water Purification Study : गंगेचं पाणी शुद्ध का राहते?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/759d6529a8158b33602010d32535fb28173937511446390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Himangi Sakhi Camp attacked : हिमांगी सखी यांच्या कॅम्पला घेराव घालत तरुणांकडून हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/96b976c8429411b5bd9663ce843347c71739092853576718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/53dbed56d06817cdca751f0a731aabb01739035978064718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/4cdfc3062939edcdfd61849d51eec19f1739028486776718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)