Rahul Gandhi Full Speech Delhi : हे सरकार मोदींचे नाही,अंबानी,अदानींचे,लाल किल्ल्यावरील संपूर्ण भाषण
Rahul Gandhi At Delhi Lal killa Speech: काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi News) यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला. आज काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) दिल्लीत पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं की, देशात मोदींचं नाही तर अदानी अंबानींचं सरकार आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, संपूर्ण देशाला माहित आहे की देशातलं हे सरकार नरेंद्र मोदींचे सरकार नाही, हे अंबानी अदानींचे सरकार आहे. मी 2,800 किमी चाललो, मला कुठेही द्वेष किंवा हिंसाचार दिसला नाही, परंतु जेव्हा मी न्यूज चॅनेल उघडतो तेव्हा मला नेहमीच द्वेष-हिंसा दिसते, असेही ते म्हणाले.






















