Dowry : नर्सिंग कॉलेजच्या अभ्यासक्रमात हुंडा प्रथेचे फायदे? खासदार प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप
देशातली हुंडा प्रथा बंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.. देशात हुंडाविरोधी चळवळी झाल्या, हुंडाविरोधी कायदेही झाले... मात्र असं असताना नर्सिंग कॉलेजच्या सोशॉलॉजीच्या पुस्तकात हुंडा प्रथेचे फायदे शिकवले जात असल्याचं शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी निदर्शनास आणून दिलंय. सोशॉलॉजी फॉर नसर्सेस या टी के ईंद्राणी यांच्या पुस्तकात हुंडा प्रथेचे फायदे नमूद केल्याची तक्रार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेय. हे पुस्तक अभ्यासक्रमातून त्वरित हटवावं अशी मागणीही त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहीलंय. अशा प्रकारे महिला विरोधी साहित्य शैक्षणिक अभ्यासक्रमता येणार नाही त्याची काळजी घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केलेय.























