एक्स्प्लोर
PM Narendra Modi at Red Fort: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण
PM Narendra Modi at Red Fort: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी सलग दहाव्यांदा देशाला संबोधित करणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लाल किल्ल्यावरुन हे त्यांचं शेवटचं भाषण असेल. लाल किल्ल्यावर पोहोचल्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव गिरीधर अरमाने पंतप्रधानांचे स्वागत करतील. पंतप्रधानांच्या गार्ड ऑफ ऑनर तुकडीत लष्कर, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांचे प्रत्येकी एक अधिकारी आणि प्रत्येकी 25 कर्मचारी आणि नौदलातील एक अधिकारी आणि 24 कर्मचारी असतील.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















