Narendra Modi Speech : भारताच्या हक्काचं पाणी हे भारतासाठीच वाहणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार
नवी दिल्ली : विकासाच्या मार्गावर जाण्याचं भारताकडे सामर्थ्य असून देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा फायदा पोहोचण्यासाठी आम्ही काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. या आधी व्होट बँकेचा विचार करुन निर्णय घेतले जात नव्हते. पण आम्ही राष्ट्रहितासाठी सर्व आवश्यक गोष्टी केल्या असंही ते म्हणाले. आधी भारताच्या हक्काचे पाणी भारताला मिळत नव्हते. पण आता भारताच्या हक्काचं पाणी हे भारतासाठीच वाहणार, थांबणार आणि भारताच्याच उपयोगी येणार असा निर्धार व्यक्त करत नरेंद्र मोदींनी भारताच्या धोरणाची दिशा निश्चित केली. एबीपी नेटवर्कच्या India@2047 परिषद कार्यक्रमात ते बोलत होते.
Narendra Modi Speech India@2047 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण
बदलत्या भारताचे सर्वात मोठं स्वप्न आहे आणि ते म्हणजे 2047 सालापर्यंत विकसित होणं. आपल्याकडे सामर्थ्य, संसाधन आणि इच्छाशक्ती आहे. जोपर्यंत आपले ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असं विवेकानंद यांनी म्हटलं होतं. आज तिच जिद्द प्रत्येक भारतीयात दिसते.
ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा झाली. त्यामध्ये इंडिया यूके फ्री ट्रेड अॅग्रीमेंटवर अंतिम निर्णय झाला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या आधी ऑस्ट्रेलिया, मॉरिशस आणि इतर देशांसोबतही असा करार करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आज जगासोबत चालत एक लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गावर आहे























