(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NIA Raids 11 locations Bengaluru : बंगळुरू आणि कोईम्बतूरसह 11 ठिकाणी NIA चे छापे
बंगळुरूतील रामेश्वरम कॅफे ब्लास्टप्रकरणी एनआयएची ११ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात बंगळुरू आणि कोईम्बतूरसह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. याप्रकरणी आतापर्यंत २ आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे.
हे देखील व्हिडिओ पाहा
Sanjay Raut on Pune Accident Case : पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करावं, संजय राऊतांची मागणी
Pune Car Accident पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे आलिशान पोर्शे कारने (Porsche Car) दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याचदरम्यान काही धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी-
अल्पवयीन मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती. तर ही कार विनानोंदणीच (विनारजिस्ट्रेशन) रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन ही कार पुण्यात आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती अजूनपर्यंत पूर्ण झाली होती. त्यामुळे ही कार इतके दिवस विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. इतरवेळी हेल्मेट घातलं नसताना कारवाईचा दंड ठोठवणारे पोलीस मार्चपासून ही कार विनाक्रमांक धावतेय, हे का बघू शकले नाही?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.