Congress President : काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर?
काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होत आहे. त्याआधीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंब बाहेरील व्यक्ती अध्यक्ष होऊ शकतो ही चर्चा सुरु झाली आहे. राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे नेतृत्व देण्याची चर्चा रंगू लागली आहे. यात सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार आणि अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा आहे. अशोक गेहलोत राज्य सोडण्यास अनुत्सुक असल्याने काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशील कुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील एका गटाकडून सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. पण सुशील कुमार शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.























