Modi Cabinet Portfolio : नरेंद्र मोदींचे मंत्रिमडळ जाहीर, गडकरी ते मोहोळ, कुणाला कुठलं खातं?
PM Modi Ministries : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह मंत्रिमंडळाने रविवारी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधानांसह 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री, 5 स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री यांचा समावेश आहे. सोमवारी कॅबिनेट मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी मोदी 3.0 कॅबिनेटचा शपथविधी पार पडला आणि सोमवारी संध्याकाळी एनडीए सरकारनं खातेवाटपही जाहीर केलं आहे.
यंदाच्या खातेवाटपात विशेष करुन महत्वाच्या खात्यांमध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक खातं, तर अमित शाहांकडे पुन्हा गृह आणि सरकार खातं देण्यात आलं आहे. तसेच एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय देण्यात आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोण-कोणत्या खात्याची जबाबदारी आहे, हे जाणून घ्या.
नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदासोबतच अंतराळ मंत्रालय आणि अणुऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यासोबतच पंतप्रधान मोदींकडे कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन खात्याची जबाबदारीही आहे.