एक्स्प्लोर
Bharti Pawar : जी जबाबदारी दिलीय त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन : डॉ. भारती पवार
जनतेच्या आशीर्वादाने हे सरकार स्थापन झालं आणि या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. यासाठी मी जनतेचे आभार मानते. तसेच जी जबाबदारी मिळाली आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन असं डॉ. भारती पवार यांनी म्हटलं.
डॉ. भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. राष्ट्रावादीने तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजय मिळवला. डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते पदाबरोबरच प्रदेश उपाध्यक्षपद भूषविलेले आहे. त्या राष्ट्रवादीकडून दोनदा जिल्हा परिषद सदस्यही राहिल्या आहेत. डॉक्टर असल्याने एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते.
आणखी पाहा























