Karnataka Legislative Council उपसभापती एस. एस धर्मगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला
कर्नाटक विधानपरिषदचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये चिकमंगळुरुमधील कादूरजवळच्या रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. कदूर पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मेगौडा यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये 15 डिसेंबर रोजी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी केलेल्या मारहाणीमुळे दु:खी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
विधानपरिषदेत 15 डिसेंबर रोजी काँग्रेस सदस्यांनी एस एल धर्मेगौडा यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. तसंच त्यांना खुर्चीवरुन ढकललं होतं. धर्मेगौडा या घटनेने अतिशय दु:खी होते.





















