Karnataka Hijab Controversy : देशात हिजाबवरुन रणकंदन, कर्नाटकात शाळा आणि कॉलेज तीन दिवस बंद
आणि या हिजाबरून गाजत असलेल्या वादाची सुरुवात कर्नाटकात झालेय. सध्या हा वाद कर्नाटकात चांगलाच चिघळलाय...कर्नाटकातल्या काही शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेर यावरुन राडा झाला. कर्नाटकातल्या काही कॉलेजमध्ये हिजाबवरुन विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता..त्यामुळं मुलींनी आंदोलन सुरु केलं होतं..त्याला उत्तर देण्यासाठी कर्नाटकातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला.... त्यानंतर दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली.. या सगळ्यात विद्यार्थ्यांच्या जय श्री रामच्या घोषणा सुरु झाल्या. उडूपीतल्या एका शिक्षण संस्थेत एका मुस्लिम विद्यार्थिनीनं शेकडो विद्यार्थ्यांच्या समोर अल्ला हू अकबरचा नारा दिला. शिमोगा इथं झालेल्या दगडफेकीनंतर १४४ कलम लागू करण्यात आलंय..कर्नाटकातल्या काही शिक्षण संस्थांमध्ये भगवे ध्वजही फडकावण्यात आले आहेत. शिक्षण संस्थांमध्ये सुरु असलेल्या या घटनांमुळं कर्नाटक सरकारनं राज्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालये ३ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय...विद्यार्थ्यांनी शांतता बाळगावी..राजकीय पक्षांच्या हातातलं खेळणं होऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलंय.
![Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f11df49eed4e9cd2c7c2e312907f07091739729487045718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ganga River Water Purification Study : गंगेचं पाणी शुद्ध का राहते?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/759d6529a8158b33602010d32535fb28173937511446390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Himangi Sakhi Camp attacked : हिमांगी सखी यांच्या कॅम्पला घेराव घालत तरुणांकडून हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/96b976c8429411b5bd9663ce843347c71739092853576718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/53dbed56d06817cdca751f0a731aabb01739035978064718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![PM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/4cdfc3062939edcdfd61849d51eec19f1739028486776718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)