Indigo Delhi Raipur Flight : धुळीच्या वादळात अडकलं विमान, टर्बुलन्सचा थरारक व्हिडिओ समोर!
Indigo Delhi Raipur Flight : धुळीच्या वादळात अडकलं विमान, टर्बुलन्सचा थरारक व्हिडिओ समोर!
धुळीच्या वादळात अडकलं इंडिगोचं रायपूरहून दिल्लीला जाणारं विमान, टर्बुलन्सचा थरारक व्हिडिओ आला समोर
दिल्ली विमानतळावर एक विमान धुळीच्या वादळात अडकल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
दिल्लीला जात असलेल्या एका इंडिगोच्या एका विमानाला धुळीच्या वादळामुळे मध्येच लँडिंग थांबवावे लागल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट क्रमांक 6E 6313 हे विमान रायपूर येथून दिल्लीकडे जात होते. विमान जेव्हा दिल्ली विमानतळावर उतरणार होते तेव्हा वातावरण अचानक बिघडले. हवेचा वेग ८० किलोमिटर प्रति तास इतका झाला, ज्यामुळे वैमानिकाला अखेरच्या क्षणी लँडिंग रद्द करावे लागले.
यादरम्यान हे विमान काही काळ हवेतच होते आणि नंतर हवामान थोडे ठीक झाल्यानंतर ते दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. पायलटने प्रवाशांना सांगितले की जोराच्या हवेमुळे त्याने लँडिंग रद्द केले आणि सुरक्षित उंचीवर पोहोचून हवामान सुधारण्याची वाट पाहिली.
महत्त्वाच्या बातम्या























