(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India China Standoff | मॉस्कोमध्ये भारत-चीन शांतता फॉर्म्युला; तणाव कमी करण्यावर दोन्ही देशांचं एकमत
भारत आणि चीनदरम्यान सीमेवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियातील मॉस्कोमध्ये सुरु असलेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही देश सीमेवरील तणाव कमी करण्याच्या मुद्दयावर सहमत झाले. भारत आणि चीनदरम्यान तणाव कमी करण्यासाठी एका पंचसूत्रीवर सहमती झाली आहे. मॉस्कोमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे की, भारत एलएसी (लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) वर सुरु असलेला तणाव वाढवू इच्छित नाही. भारतानं म्हटलं आहे की, चीनसोबत भारताच्या धोरणात तसंच भारताविषयी चीनच्या धोरणात कुठलाही बदल झालेला नाही.
भारत-चीनदरम्यान या पंचसूत्रीवर झाली सहमती
-आपापसातील मतभेदांचं वादात रुपांतर होऊ दिलं जाणार नाही
-दोन्ही देशांचं सैन्य विवादित क्षेत्रातू वापस घ्यावं
-निश्चित केलेल्या नियमांनुसार दोन्ही देशांमधील बातचीत सुरु ठेवावी
-सध्याच्या संधी आणि प्रोटोकॉल्स दोन्ही देश मानणार
-दोन्ही देश असं कुठलंही पाऊल उचलणार नाही ज्याने तणाव वाढेल