Covaxin vaccine दिल्यानंतर Paracetamol गोळी देऊ नका, Bharat Biotech कंपनीची सूचना ABP Majha
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर लाभार्थ्याला केंद्रावर गोळी दिली जाते. पण अशा गोळीची आवश्यकता आहे का? असाही प्रश्न आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते तीव्र लक्षणं नसतील तर अशी गोळी घेण्याची गरज नाही. कोव्हॅक्सिन लस दिल्यानंतर पॅरासिटामॉल गोळी देऊ नका असा सल्ला भारत बायोटेक कंपनीनं दिलाय. लस घेतल्यानंतर त्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी शरीरामध्ये अँटिबॉडीज तयार होतात. त्याची नैसर्गिक प्रक्रिया म्हणून ताप येणं, अंगदुखी अशी लक्षणं दिसतात.ही लक्षणं ४८ तासांत कमी होतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कुठलीच लक्षणं नसताना किंवा सौम्य लक्षणं असताना औषधं घेणं टाळा असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. तीव्र लक्षणं असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्या, असं डॉक्टरांनी म्हटलंय.























