उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या Arunachal Pradesh दौऱ्याला China चा आक्षेप, भारताचं प्रत्युत्तर
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अलिकडेच केलेल्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला चीननं आक्षेप घेतला. अर्थातच भारतानं त्याला प्रत्युत्तर देत चीनला फटकारलं. चीनच्या ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियन यांनी उपराष्ट्रपती नायडू यांच्या अरुणाचल दौऱ्यावर आक्षेप नोंदवला. चीन भारतानं अवैधरित्या स्थापित केलेल्या अरुणाचल प्रदेशला मान्यता देत नाही आणि उपराष्ट्रपती नायडू यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध करतो, असं लिजियन म्हणाले होते.
त्याला भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारतीय नेत्यांच्या भारतातील दौऱ्याला चीनचा आक्षेप अनाकलनीय आहे, अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं चीनला सुनावलं.























