ABP C Voter Survey 2023 : C वोटरच्या सर्वेनुसार राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज
सर्वेनुसार राजस्थानमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, मात्र यामध्ये एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? कारण वसुंधरा राजे शिंदेंवर सध्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची खप्पामर्जी दिसतेय. दुसरीकडे, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं पारडं भारी असल्याचं सर्वेक्षणात दिसून येतंय. मात्र सर्व्हेचे आतडे पाहता मध्य प्रदेशमध्ये काँटे की टक्कर होण्याची दाट शक्यता आहे. तेलंगणामधूनही धक्कादायक निष्कर्ष समोर आलेत. कारण के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला धोबीपछाड देऊन काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज आहे. तर मिझोरममध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज सर्वेतून समोर आलाय.























