BJP National Executive meet today : दोन वर्षांनंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक
तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आज होत आहे. कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच ही बैठक हायब्रीड पद्धतीने होत आहे. काही सदस्य दिल्लीत थेट तर काही आपल्या राज्यातून व्हर्च्युअल पद्धतीने या बैठकीत सहभागी होतील. 124 सदस्य दिल्लीत तर 360 वर्चुअल पद्धतीने असतील. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी महत्त्वाची बैठक असल्याचं बोलं जात आहेत. देशात शंभर कोटी डोस पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांच्या सत्काराचा राजकीय ठराव या बैठकीत संमत होऊ शकतो. महाराष्ट्रातून विनोद तावडे पंकजा मुंडे सुनील देवधर हे राष्ट्रीय पदाधिकारी थेट पद्धतीने सहभागी असतील, तर देवेंद्र फडणवीस चित्रा वाघ आणि इतर कार्यकारिणी सदस्य व्हर्च्युअल पद्धतीने राज्यातूनच असतील. दुपारी तीन वाजेपर्यंत ही बैठक चालण्याची शक्यता त्यानंतर पंतप्रधानांच्या संबोधनाने बैठकीचा समारोप होईल