Assam Tea : आसाममधील लाखमोलाचा चहा, Golden Pearl Tea ला 99 हजार 999 रुपयांचा दर
राजकारणाच्या आणि इतर घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेतच. मात्र तत्पूर्वी सकाळी सकाळी मूड रिफ्रेश करणारी एक बातमी... सकाळी उठून चहाची तलफ बहुतेकांना येतेच.. आपल्यापैकी अनेकजण आत्ता हातात चहाचा कप घेऊन एबीपी माझावर बातम्यांचा आस्वाद घेत असतील.. अशाच चहा प्रेमींसाठी एक लाख मोलाची बातमी... आसामच्या दिब्रुगढमध्ये तयार झालेल्या एका चहाला चक्क लाखमोलाचा दर मिळालाय. दिब्रुगढच्या नाहोरचुकबारी कारखान्यात तयार झालेल्या गोल्डन पर्ल टीला चहाच्या लिलावात चक्क 99 हजार 999 रुपये प्रतिकिलो एवढा दर मिळाला आहे. आसाम टी ट्रेडर्सनं या खास चहासाठी ही बोली लावली. गोल्डन पर्ल टी हा आसामच्या दिब्रुगढमधील स्पेशल चहा आहे. चहाच्या मळ्यामधून आलेल्या पानांवर प्रक्रिया करून हा स्पेशल चहा तयार केला जातो. गोल्डन पर्ल टी शिवाय अरुणाचल प्रदेशातील गोल्डन नीडल आणि आसामच्या गोल्डन बटरफ्लाय या चहांना प्रतिकिलो 75 हजारांचा दर मिळाला आहे.