Assam-Mizoram Conflict : आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील सीमावादातून काल अचानक घडलेल्या हिंसाचारात आसामचे सहा पोलीस ठार झाले, तर पोलीस अधीक्षकांसह ५० जण जखमी झाले. आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचाराला तोंड फुटले. सहा तास ही धुमश्चक्री सुरू होती. या हिंसाचारानंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांवर आरोप केले आणि केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथंगा यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढण्याची सूचना त्यांनी केली.























