Amarinder Singh: पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंह यांची पहिली प्रतिक्रिया
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जात त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. राजीनामा देण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कल्पना दिली असल्याची माहितीही अमरिंदर सिंह यांनी दिली.
राजीनमा अमरिंदर सिंह यांनी म्हटलं की, ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना काँग्रेस अध्यक्षांनी मुख्यमंत्री बनवावं. सरकार चालवण्यासंदर्भात माझ्यावर संशय निर्माण करण्यात आला आहे. माझा अपमान करण्यात आला. मी अजूनही काँग्रेस पक्षात आहे. सकाळी मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनाम्यासंदर्भात माहिती दिली होती. मला सर्व रस्ते खुले आहेत. सर्व पर्यायांवर विचार केला जाईल. समर्थकांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल असं, अमरिंदर सिंह यांनी म्हटलं.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
