Hingoli Aundha nagnath Mandir: हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिराच श्रावणी सोमवारनिमित्त गर्दी
Hingoli Aundha nagnath Mandir: हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिराच श्रावणी सोमवारनिमित्त गर्दी
हेही वाचा :
जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदीच्या (Girna River) पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालूच आहेत. हे सर्वजण अजूनही पुराच्या पाण्यातच अडकलेले असून त्यांनी संपूर्ण रात्र खडकावर बसून काढली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात सर्दपूर पाऊस बरसत (Nashik Rain Update Today) आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या पाणीपातळीत वाठ होत आहे. याच कारणामुळे नदीच्या पुरात अडकलेल्या 12 जणांना वाचवण्यासाठी अनके अडचणी येत आहेत. दरम्यान, बचावकार्यासाठी आता धुळे येथून एसडीआरएफची विशेष टीम बोलावण्यात आली आहे.
रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार धुळे येथून बोलावण्यात आलेली एसडीआरएफची टीम 4 ऑगस्ट रोजीच्या रात्रीच घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र अंधारामुळे बचाव कार्य थांबविण्यात आले होते. आज (5 ऑगस्ट) सकाळी पुन्हा एखदा अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी कमी होताच पुन्हा बचाव कार्य सुरु केले जाणार आहे.