Dr. Anil Awachat Passed Away : अवचट कुटूंब आणि आमचे घनिष्ट संबंध होते : Baba Adhav | ABP Majha
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालंय. दीर्घ आजारामुळे वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अनिल अवचट हे पेशानं पत्रकार आणि लेखक, आपली लेखणी त्यांनी कायमच सामान्य जनतेच्या हितासाठी वापरली. 1969 साली त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्यानंतर विविध विषयांवरची त्यांची 22पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. दलित भटक्या जमाती, वेश्या यांच्याबद्दल त्यांनी विपुल लिखाण केलेलं आहे. पुण्यातल्या मुक्तांगण व्यवसनमुक्ती केंद्राचे ते संचालक होते. त्यांनी शोधून काढलेली व्यसनमुक्तीची अनोखी पद्धत जगभरातल्या अनेक केंद्रांमध्ये वापरली जाते. अनिल अवचट यांचं पार्थिव दुपारी दोन वाजल्यापर्यंत पत्रकार नगर इथे अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या जाण्यानं एक संवेदनशील आणि बहुआयामी व्यक्तीमत्व हरपल्याची हळहळ व्यक्त होतेय.