Dhule dispute: सांगवी वादातील 13 पैकी 10 संशयितांची कोठडी आज संपणार
Dhule dispute: सांगवी वादातील 13 पैकी 10 संशयितांची कोठडी आज संपणार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. या प्रकरणी १३ संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यापैकी १० जणांना सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे. आज या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे या संशयितांना आज न्यायालय जामिनावर सुटका करणार की पोलीस कोठडी कायम ठेवणार हेही पाहावं लागणार आहे,. तसंच या घटनेप्रकरणी पोलिसांकडून अटक सत्र कायम असून आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची संख्या ही 17 झाली आहे.



















