Congress G 23 बैठकीत उत्तर प्रदेशच्या प्रभारी असलेल्या Priyanka Gandhi यांच्यावर थेट निशाणा
काँग्रेसच्या जी २३ नेत्यांच्या बैठकीत उत्तर प्रदेशच्या प्रभारी असलेल्या प्रियंका गांधी यांच्यावरच थेट निशाणा साधण्यात आलाय...... ५ राज्यांतील पराभवानंतर प्रभारी सरचिटणीसांचा राजीनामा का घेतला नाही?, असा सवाल काँग्रेसच्या या नेत्यांनी केलाय. याबाबत जी-२३ गटाचे नेते काँग्रेस नेतृत्त्वाला जाब विचारणार आहेत. गुलाम नबी आझाद यांच्या घरी काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांची बैठक काल झाली. त्यात पराभवावर मंथन करण्यात आलं. पराभवाला जबाबदार लोकांचीच पराभवाचा आढावा घेणाऱ्या समितीत वर्णी लावण्यात आल्याचा आरोप नेत्यांनी केलाय....काँग्रेसचा कारभार काही लोकांच्या कोंडाळ्याकडे आहे, असं टीकास्त्रही या नेत्यांनी सोडलंय......
महत्त्वाच्या बातम्या





















